घरमहाराष्ट्रपिंपरी, चिंचवड आणि भोसरीमध्ये बंडखोरी! राजकीय परिस्थिती गोंधळलेल्या अवस्थेत

पिंपरी, चिंचवड आणि भोसरीमध्ये बंडखोरी! राजकीय परिस्थिती गोंधळलेल्या अवस्थेत

Subscribe

राष्ट्रवादी, शिवसेना पक्षातील उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वत्र बंडखोर उमेदवारांची धावपळ पाहायला मिळाली. बंडखोरी करत राष्ट्रवादी, शिवसेना पक्षातील उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या सर्व घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सुलक्षणा धर यांचा पत्ता कट

पिंपरी, चिंचवड, आणि भोसरी मतदारसंघात चाललंय काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. पिंपरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर अण्णा बनसोडे यांची ऐन वेळी वर्णी लागल्याने सुलक्षणा धर यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी अर्ज भरला, तर सुलक्षणा धर यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वाचा – मुंबईत किती कर्मचारी, अधिकाऱ्यांची फौज लागलीए निवडणुकीच्या कामाला

शिवसेनेच्या राहुल कलाटे यांची बंडखोरी

दुसरीकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान, राज्यात सेना आणि भाजपा यांची युती आहे. अस असताना बंडखोरी करत कलाटे यांनी आमदार लक्ष्मण जगताप विरोधात दंड थोपटले आहेत. तर राष्ट्रवादीकडून प्रशांत शितोळे यांनी अर्ज भरला.

विलास लांडे यांचा अपक्ष अर्ज

भोसरी मतदारसंघात अद्यापसुद्धा राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास पक्षातील नेते तयार नाहीत. त्यामुळे अजित पवार यांची परवानगी घेऊन माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरला आहे. त्यांना राष्ट्रवादी पुरस्कृत पाठिंबा आहे. राष्ट्रवादीच्या दत्ता साने यांनीसुद्धा अपक्ष अर्ज दाखल केला आहे. हे सर्व असताना भाजपाकडून आमदार महेश लांडगे हे निवडणूक लढवत आहेत. हे सर्व राजकीय गणित पाहता ‘एक गाव भोसरी, बारा गाव दुसरी’ याचा प्रत्येय येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -