घरमहाराष्ट्रश्रीपाद छिंदम विधानसभेच्या रिंगणात; बसपामधून लढवणार निवडणूक

श्रीपाद छिंदम विधानसभेच्या रिंगणात; बसपामधून लढवणार निवडणूक

Subscribe

छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम महाराष्ट्र विधानसभेच्या रिंगणात उतरला आहे. मायावतींच्या बहुजन समाज पक्ष (बसपा)ने श्रीपाद छिंदम यांना अहमदनगरमधून उमेदवारी दिली आहे. अहमदनगर शहर मतदारसंघातून श्रीपाद छिंदम राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याविरोधात लढणार आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर जिंकून आलेल्या छिंदम यांना उपमहापौर करण्यात आले होते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता.

२०१८ साली फेब्रुवारी महिन्यामध्ये फोनवरील संभाषणादरम्यान शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर छिंदम चर्चेत आला होता. या प्रकरणामध्ये त्याला त्याेचे पद गमवावे लागले होते.

- Advertisement -

९ डिसेंबर २०१८ रोजी अहमदनगर महापालिकेची निवडणूक झाली आणि १० डिसेंबरला निकाल लागला. श्रीपाद छिंदम अहमदनगरमधील प्रभाग क्रमांक नऊमधून तब्बल १९७० मतांनी निवडून आले होते. छिंदम यांना एकूण ४५३२ मतं मिळाली होती. तर त्यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांना २५६२ मतं मिळाली. अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत अनेक उमेदवार १०० ते २०० मतांच्या फरकाने पडले. पण छिंदमचा विजय तब्बल १९७०  मतांनी झाला होता.

हेही वाचा –

पिंपरी, चिंचवड आणि भोसरीमध्ये बंडखोरी! राजकीय परिस्थिती गोंधळलेल्या अवस्थेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -