घरमहाराष्ट्रदोन्ही हात नसतानाही लोकशाहीच्या उत्सवात दिलं महत्वपूर्ण योगदान

दोन्ही हात नसतानाही लोकशाहीच्या उत्सवात दिलं महत्वपूर्ण योगदान

Subscribe

हात नसताना देखील तिने समोर येऊन मतदानाचा हक्क बजावला आणि लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवामध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले

भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा सोहळा असणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. पुण्यात विधानसभेच्या आठ जागा असून या आठही जागांवर सकाळपासून मतदान करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. यांमध्ये अनेक तरुणांसह वृद्ध अपंग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. परंतु पुण्यातील एका महिलेने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण ​दोन्ही हात नसतानाही पुण्यातील सुरेखा खुडे या महिलेने मतदान करून आपला हक्क बजावला आहे. हात नसताना देखील तिने समोर येऊन मतदानाचा हक्क बजावला आणि लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवामध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले.

अभिमानास्पद कामगिरी बजावणारी ‘ही’ मतदार

पुण्यातील पर्वती मतदारसंघात सुरेखा खुडे यांना दोन्ही हात नाहीत. तरीही सकाळीच मतदानकेंद्रावर येत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांना मतदान करण्यास मदत केली.

- Advertisement -

अनेकदा नागरिक मतदानाची सुट्टी मतदानासाठी न वापरता इतर कामासाठी वापरतात. काही लोक मतदान करण्याबद्दल अनास्था दाखवतात. अश्या नागरिकांचे डोळे उघडण्याचे काम खुडे यांनी केले आहे. सकाळीच त्या मतदान केंद्रावर आल्या. त्यांना तेथील कर्मचाऱ्यांनी मतदान करण्यास मदत केली. मतदान केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांनी इतर लोकांनी सुद्धा घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले.

दरम्यान ३ वाजेपर्यंत पुण्यात ४२ टक्के मतदान झाले होते. लोकसभेला ५० टक्क्यांहून कमी मतदान झाले होते. त्यामुळे पुणेकर लोकसभेपेक्षा अधिक मतदान करतात का? याची दिवसभर उत्सुकता होते.


Maharashtra Assembly: पुण्यात ‘कँडल लाईट’ वोटिंग!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -