घरमहाराष्ट्रविधानसभा निवडणूक काळात राज्यात ३ कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त

विधानसभा निवडणूक काळात राज्यात ३ कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त

Subscribe

विधानसभा निवडणूक काळात राज्यात ३ कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या तीन दिवसांत आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग, पोलीस यांनी केलेल्या कारवाईत एकूण ३ कोटी ७९ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १ कोटी ३६ लाखांची रोख रक्कम, १ कोटी ६८ लाख किंमतीचे मद्य, २९ लाख रुपये किंमतीचे मादक पदार्थ आणि ४६ लाख रुपये किंमतीचे मौल्यवान दागिने यांचा समावेश असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा – शरद पवार पोटनिवडणुकीला उभे राहिले तर… आणि उदयनराजेंना अश्रू अनावर

- Advertisement -

आचारसंहिता भंग प्रकरणी आतापर्यंत ५० गुन्हे दाखल

आदर्श आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत शासकीय जागेवरील ७५ हजार ९८१, सार्वजनिक ठिकाणच्या ७३ हजार ४४५ आणि खासगी ठिकाणावरील १६ हजार ४२८ जागांवरील अनधिकृत फलक, बॅनर, कटआऊट आणि झेंडे काढण्यात आले आहेत. सर्व जाहिराती, पोस्टर आणि कटआऊट हटविण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुदतीत हे सर्व साहित्य काढण्यात येत आहेत. आचारसंहिता भंग प्रकरणी आतापर्यंत ५० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कायद्यानुसार बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करू नये आणि पर्यावरणाला हानी पोहचेल अशा वस्तू टाळाव्यात, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -