घरदेश-विदेश९८ वर्षांच्या आजीचा 'योग' उत्साह.. तरुणांनाही लाजवणारा

९८ वर्षांच्या आजीचा ‘योग’ उत्साह.. तरुणांनाही लाजवणारा

Subscribe

आज सर्वत्र जागतिक योग दिनाचा उत्साह आहे. योग करण्यासाठी वयाचं कोणतंच बंधन नसतं हे पटवून देणाऱ्या एक आजी आहेत. वयाच्या ९८ व्या वर्षीही या आजी तरुणांना लाजवेल असा योग करतात. पाहूया, या 'सुपर आजींचा' थक्क करणारा व्हिडिओ.

आज देशभरात सर्वत्र चवथ्या जागतिक योगदिनाचीच चर्चा आहे. यानिमित्ताने सर्वच वयोगटातील लोक योग करतानाचे आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. मात्र, असे अनेक लोक आहेत जे दररोज न चुकता ‘योग साधना’ करत असतात. अशाच एक ९८ वर्षांच्या आजी आहेत ज्या गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनियमाने योग करत आहेत. त्यामुळे आजपर्यंत कायमच त्यांनी आजारांना दूर पळवलं आहे.

योगासाठी नाही वयाचं बंधन

या आहेत कोयम्बतूरच्या ९८ वर्षीय ‘नन्नामल’ आजी. वयाच्या ९८व्या वर्षीही त्या ज्या उत्साहाने आणि अचूकतेने योग करतात, तो तरुणांनाही लाजवणारा आहे. काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर नन्नामल आजींचा योग व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आज योग दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहुया तो व्हिडिओ आणि जाणून घेऊया त्यांच्या योग साधनेविषयी.

- Advertisement -

(व्हिडिओ सौजन्य- युट्युब)

तरुणांसाठी आहेत ‘आदर्श’

नन्नामल आजी गेल्या अनेक वर्षांपासून नियमीतपणे योगसाधना करत आहेत. त्यांना देशातील सर्वाधिक वयाच्या योगगुरु असं संबोधलं जातं. अनेक कठिण आसनं आजी अगदी सहजरित्या करतात. योगासनं करतानाची आजींची लवचिकता पाहण्यासारखी असते. आजींची आसनं करण्याची पद्धत खरोखरंच थक्क करणारी असते. त्यामुळेच या आजी अनेक तरुण मुला-मुलींच्या आदर्श ठरल्या आहेत. असंख्य तरुण-तरुणी त्यांना आपला ‘योग आयडॉल’ मानतात. यामध्ये स्थानिकांबरोबरच संपूर्ण जगातील तरुणांचाही समावेश आहे.

- Advertisement -

आजी आहेत ‘योग शिक्षिका’

आजी स्वत: उत्तम योग करतातचं. मात्र, त्याचसोबत त्या योगासनं शिकवण्याचंही काम करतात. संपूर्ण जगभरातून त्यांचे एकूण ६०० विद्यार्थी आहेत. आजींचा योगाभ्यास जितका दांडगा आहे तितकंच त्यांचं नेचरोपॅथीचं ज्ञानही समृद्ध आहे. त्यांना अनेक वनौषधींची सखोल माहिती आहे. याबाबत त्या इतरांमा आवश्यक ते सल्लेही देतात. ‘योगसाधनेचा वारसा आपल्याला आपल्या वडिलांकडून मिळाल्याचं’, आजी सांगतात. त्यांचे वडीलही खूप पारंगत योग अभ्यासक होते.

आजींच्या फिटनेसचा ‘राज’

या वयात अशाप्रकराचा फिटनेस राखणं अजिबातच सोपं नाही. आजीसुद्धा ठणठणीत राहण्यासाठी अनेक पथ्यं पाळतात. रोज पहाटे उठून त्या किमान अर्धा लिटर पाणी पितात. त्यानंतर त्या आपली नियमीत योगसाधना करतात. ठराविक व्यायाम झाल्यानंतर काही काळ आराम करुन मग त्या त्यांच्या विद्यार्थ्यांना योगासनं शिकवण्यासाठी जातात. आजींचा आहारामध्ये फळं आणि मधाचा जास्त प्रमाणात समावेश असतो. थोडक्यात त्यांचा आहार कॅल्शिअम आणि फायबरनी परिपूर्ण असतो. आजीं संध्याकाळी ७ वाजताच आपलं जेवण उरकतात आणि शक्य तितक्या लवकर झोपतात.

आजच्या पिढीच्या सर्वच तरुणांनी खरोखरंच नन्नामल आजींचा आदर्श ठेवण्यासारखा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -