इंटरनेटचा अधिक वापर करणारे विद्यार्थी अभ्यासात ‘ढ’

जे विद्यार्थी डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक वापर करतात ते अभ्यासाशी पूर्णपणे निगडीत होऊ शकत नाहीत आणि याबाबतीत अपयशी देखील ठरतात, त्यामुळे इंटरनेटचा अधिक वापर करणारे विद्यार्थी अभ्यासात 'ढ' असल्याचे समोर आले आहे.

Mumbai
Less in the study using overuse internet be careful
इंटरनेटचा अधिक वापर करणारे विद्यार्थी अभ्यासात 'ढ'

सध्याच्या युगात इंटरनेटचा सर्रास वापर केला जातो. मात्र, या इंटरनेटचा अभ्यासावर परिणाम होत असल्याची माहिती समोर आली आहे. जे विद्यार्थी डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक वापर करतात ते अभ्यासाशी पूर्णपणे निगडीत होऊ शकत नाहीत आणि याबाबतीत अपयशी देखील ठरतात, असे ब्रिटन आणि इटलीतील संशोधकांनी म्हटले आहे. इंटरनेटच्या अधिक वापरामुळे त्यांना अभ्यासात अपेक्षित परिणाम मिळत नाही आणि त्यांच्यामध्ये एकाकीपणाची भावना वाढीस लागते.

दिवसभर चार तास ऑनलाईन

ब्रिटनच्या स्वानसी आणि इटलीच्या मिलान युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संयुक्त संशोधन केले आहे. जगभरातील २८५ विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांचा डिजिटल तंत्राचा वापर, अभ्यास आणि परीक्षेचा निकाल याबाबत माहिती घेण्यात आली. या पाहणीत २५ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले की, ते दिवसभर चार तास ऑनलाईन होते. तर ७० टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले ती त्यांनी एक ते तीन तास इंटरनेटचा वापर केला आहे. यामध्ये ४० टक्के विद्यार्थ्यांनी सोशल नेटवर्किंगचा वापर केला तर ३० टक्के विद्यार्थ्यांनी माहितीसाठी नेट वापरले. मुख्य संशोधक ब्रिटनचे फिल रीड यांनी सांगितले की, इंटरनेटचे व्यसन आणि अभ्यासासाठी प्रेरणा यामध्ये एक नकारात्मक संबंध असल्याचे या पाहणीतून दिसून आले आहे. तसेच जे विद्यार्थी इंटरनेटचा अधिक वापर करतात ते विद्यार्थी अभ्यसाशी ताळमेळ बसवू शकत नाही आणि ते अभ्यासामुळे काळजीत देखील पडतात.


हेही वाचा – नवरीच्या आईला घेऊन नवरदेवाचे वडील फरार, लग्न बोंबलले