Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर देश-विदेश प्रवासादरम्यान व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह! ट्रेनमध्ये उडाली खळबळ

प्रवासादरम्यान व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह! ट्रेनमध्ये उडाली खळबळ

कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच त्याला ट्रेनमधून खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Mumbai
प्रवासादरम्यान व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह! ट्रेनमध्ये उडाली खळबळ

कोरोना विषाणूमुळे जगभरात कहर सुरू असताना त्याचा परिणाम भारतावरही झाला आहे. दरम्यान या आजाराबद्दल लोकं गंभीर झाले असून त्यांच्या मनात कोरोनाबद्दल भिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे त्याला कळले तेव्हा त्या ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. हा व्यक्ती कोझिकोड-तिरुअनंतपुरम जन शताब्दी एक्सप्रेसमधून प्रवास करत होता. रेल्वेच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, कन्याकुमारी येथे राहणाऱ्या या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी तो ट्रेनमध्ये चढला आणि त्याने आपला प्रवास सुरू केला होता. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच त्याला ट्रेनमधून खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अधिकाऱ्यांच्या मते, कोझिकोड जिल्ह्यातील कुन्नमंगलम येथील एका मजुराने कोरोनाची काही लक्षणे जाणवल्यानंतर कोझिकोड येथे तीन दिवसांपूर्वी कोरोना टेस्टसाठी नमुना दिला होता. चाचणीचा रिपोर्ट येण्यापूर्वीच तो आपल्या गरोदर पत्नीला रूग्णालयात दाखल करण्यासाठी आपल्या गावी जात होते.

ती व्यक्ती तामिळनाडूहून आपल्या गावी जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढली. प्रवासादरम्यान त्यांना आरोग्य अधिकाऱ्यांचा फोन आला आणि त्याला एर्नाकुलम टाउन रेल्वे स्थानकात उतरण्यास सांगण्यात आले. वृत्तानुसार कोझिकोडमधील आरोग्य अधिका्यांनी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला, परंतु ट्रेनने आधीच स्टेशन सोडले होते.  त्यानंतर त्याने त्रिशूर जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती दिली, त्यानंतर ते त्रिशूर स्टेशन गाठणार तोपर्यंत तेथूनही ट्रेन सुटली होती. एर्नाकुलममध्ये आरोग्य अधिका्यांनी त्या व्यक्तीला ट्रेनमधून खाली नेले आणि रुग्णालयात दाखल केले.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना संक्रमित व्यक्ती उतरल्यानंतर तो ज्या डब्यातून प्रवास करीत होता त्याला सील करण्यात आले होते, जेणे करून इतर व्यक्ती त्या डब्ब्यात प्रवेश करणार नाहीत.


Delhi Corona: एका दिवसात १,११८ नव्या रूग्णांची नोंद; १ हजारांहून अधिकांना डिस्चार्ज

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here