दिवाळीत दिल्लीतील प्रदूषणाने मोडला मागच्या चार वर्षांचा रेकॉर्ड

दिल्लीत वातावरण इतके दूषित झाले आहे दिल्ली सरकारने लोकांना कारणाशिवाय बाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या आहेत.

national air quality index cross 900 level in diwali night
दिवाळीत दिल्लीतील प्रदूषणाने मोडला मागच्या चार वर्षांचा रेकॉर्ड

दिल्लीतील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. यंदाच्या वर्षी देशभरात फटाके फोडण्यास बंदी करण्यात आली होती. तरीही दिल्लीतील लोकांनी या वर्षी मागच्या चार वर्षांतील प्रदूषणाचा रेकॉर्ड मोडला आहे. दिल्लीतील लोकांना फटाके न फोडण्याची ऑर्डर देऊनही दिल्लीतील गगनचुंबी इमारतीत राहणाऱ्या लोकांनी या वर्षी दिवाळीत इतके फटाके फोडले की मागच्या चार वर्षांत सर्वात जास्त प्रदूषणाची नोंद झाली आहे. दिवाळीच्या दिवसात दिल्लीत हवेची गुणवत्ता ९००च्या वर होती. गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीचे वाढते प्रदूषण लक्षात घेता एनजीटी कडून सर्वोच्च न्यायालयात कडक आदेश देण्यात आले होते. अनेक जाहिरातीमधून फटाके न फोडण्याचे आव्हान करण्यात आले होते. परंतु दिल्लीतील लोकांनी या सगळ्यावर पाणी फेरले. गाझियाबादच्या जिल्हा रूग्णालयात दिवाळीच्या रात्री श्वसनाच्या विकाराचे ५५० रूग्ण समोर आले होते.

दिल्लीतील वाढते प्रदूषण हे भारताच्या आतंरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचा विषय झाला आहे. हवेतील AQI ५०० आहे म्हणजे ही हवा माणसांसाठी श्वास घेण्यास योग्य नाही. हे एक वैज्ञानिक सत्य आहे की दिल्लीत एका रात्रीत हेवत झालेल्या प्रदूषणामुळे ६८ कोटी लोकांचे जीवन कमी झाले आहे. दिल्लीत वातावरण इतके दूषित झाले आहे दिल्ली सरकारने लोकांना कारणाशिवाय बाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या आहेत. हवेत असलेल्या लहान लहान विषारी कणांमुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता आहे. या धूलिकणांची सीमा ६० ते १०० मायक्रोग्रॉम प्रति क्युबिक मीटर इतकी आहे. देशाच्या राजधानीवर आलेले हे मोठे सकंट आहे.

फटाके फोडल्यामुळे हवेतील प्रदूषण वाढले आहे. त्याचबरोबर फटाके फोडल्यानंतर झालेल्या कचऱ्याचे काय करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जमा झालेला कचरा जाळल्यास त्याने प्रदूषण होईल. त्याचप्रमाणे हा कचरा जर डंपिग ग्राउंडवर टाकला तर त्यातील विषारी कण जमिनीत जातील. त्यामुळे जमिन आणि भूजलावर कायमस्वरूपी प्रदूषण होत राहिल.


हेही वाचा – Birthday Special: इंदिरा गांधींच्या एका निर्णयामुळे देशातील बँकिंग व्यवस्था बदलली