पंतप्रधान मोदींनी केला जो बायडेन यांना फोन; ‘या’ विषयांवर झाली चर्चा

pm narendra modi call new us president joe biden to congratulate

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना फोन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी या दोन नेत्यांमध्ये काही विषयांवर चर्चा झाली. यावेळई नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसोबत असणाऱ्या धोरणात्मक भागीदारीचा पुनरुच्चारही केला. शिवाय, ही भागिदारी अजून मजबूत कशी करता येईल यावर चर्चा केली. नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा ट्विट करत जो बायडेन यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत जो बायडेन यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली. मोोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना फोन करुन अभिनंदन केले. भारत आणि अमेरिकेतील धोरणात्मक भागीदारीसंबंधी आपल्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. याशिवाय आम्ही कोरोना महामारी, हवामान बदल, इंडो-पॅसिफिक भागात सहकार्य अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.” मोदींनी अजून एक ट्विट करत उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांचेही अभिनंदन केले.

दरम्यान, याआधी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जो बायडेन यांच्या नेतृत्वात अमेरिकेसोबत सकारात्मक संबंध स्थापित होतील, असा विश्वास व्यक्त केला. दहशतवाद, हवामान बदल आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारत-अमेरिका एकत्रितपणे काम करण्याची शक्यता आहे.