आमिरच्या ‘या’ चित्रपटाची कथा लिहणार अतुल कुलकर्णी…

‘लाल सिंग चड्डा’ असे येणाऱ्या आगामी चित्रपटाचे नाव असून त्याकरिता अमीर तब्बल २० किलो वजन कमी करणार आहे.

Mumbai
Aamir Khan announces next film on birthday

बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा आज ५४वा वाढदिवस आहे. आज त्याच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त त्याने केक कापून आपल्या आगामी येणाऱ्या चित्रपटाची घोषणा केली. ‘लाल सिंग चड्डा’ असे येणाऱ्या आगामी चित्रपटाचे नाव असून त्याकरिता अमीर तब्बल २० किलो वजन कमी करणार आहे. आमिरने सांगितले की, ‘लाल सिंग चड्डा’ सिक्रेट सुपर स्टार चित्रपटाचे दिग्दर्शक अद्वैत चंदन असणार आहे. वायकॉम १८आणि आमिर खान प्रोडक्शन मिळून तयार करणार आहे.’

‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा रिमेक

‘लाल सिंग चड्डा’ हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा रिमेक असून येत्या ऑक्टोबर महिन्यापासून त्याचे शूटींग सुरू होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा मराठी चित्रपटसृष्टी व बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी याने लिहली आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असून २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अतुल कुलकर्णी  लिहिणार कथा

आमिर खान सोबत ‘रंग दे बसंती’ या चित्रपटात अतुल कुलकर्णीने एकत्र काम केले होते. अतुलच्या ‘नटरंग’ मधील भूमिकेचे आमिरने मनापासून कौतुक केले होते. आमिरने अतुलसोबत पुन्हा काम करायला आवडेल अशी इच्छाही एका मुलाखतीत व्यक्त केली होती. ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आमिरच्या आगामी चित्रपटाकरिता अतुल कुलकर्णी कथा लिहिणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here