Video: रितेशचा ‘हा’ व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण, म्हणाले ‘भावा टिकटॉक डिलीट कर’

बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mumbai
bollywood riteish deshmukh create weird tik tok video fan says please deleted tiktok aap
Video: रितेशचा 'हा' व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण, म्हणाले 'भावा टिकटॉक डिलीट कर'

सध्या बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख्य मुंबईत आपल्या कुटुंबसहित क्वारंटाईन झाला आहे. यादरम्यान तो सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. तो नेहमीच आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनाकरिता मजेशीर टिकटॉक व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच रितेश देशमुखने एक व्हिडिओ शेअर केला आहे जो खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रितेशने टिकटॉकचे अत्यंत लोकप्रिय म्युझिकला रिक्रिएट केलं आहे.

या व्हिडिओमध्ये रितेश म्युझिक सुरू होताच पायऱ्यावर बसलेला दिसत आहे. मग थोड्या वेळात त्याचे डोके धडापासून वेगळे होऊन ते घसरत जात असल्याचे दिसत आहे. रितेशन चाहत्यांना मनोरंजन करण्यासाठी हा प्रँक केला आहेत. काही चाहत्यांना रितेशचा हा प्रँक आवडला आहे. पण काही चाहत्यांनी हैराण होऊन रितेशला टिकटॉक अॅफ डिलीट करण्यास सांगितले आहे.

View this post on Instagram

Fun in the times of corona. #headwalks

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

रितेशच्या या व्हिडिओला ७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसंच व्हिडिओ चाहते भरभरून प्रतिक्रिया करत आहेत. यापूर्वीही रितेशने अनेक टिकटॉक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. काही व्हिडिओमध्ये रितेशची बायको जेनेलिया देखील दिसली होती. तसेच ‘मदर्स डे’ दिवशी त्यांने आईसोबत देखील टिकटॉक व्हिडिओ शेअर केला होता.

@riteishd

#mothersday #aai #bestmom

♬ original sound – riteishd

 

आजकाल टिकटॉकर्स आणि युट्यूबर्स वॉर सुरू आहे. त्यामुळे अनेक जणांनी टिकटॉक अॅप डिलिट केले आहेत. तसेच भारतात टिकटॉक बंदी घालण्याची देखील मागणी होत आहे.


हेही वाचा – Coronavirus: बोनी कपूर यांच्या घरातील आणखी दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here