घरमनोरंजनप्रेमाचा त्रिकोण... 'एक राधा एक मीरा'!

प्रेमाचा त्रिकोण… ‘एक राधा एक मीरा’!

Subscribe

महेश मांजरेकर निर्मित 'एक राधा एक मीरा' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून यामध्ये प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला आहे.

मराठी चित्रपटांमध्ये नवनवे प्रयोग होत असून ते प्रेक्षकांच्याही पसंतीस पडत असल्याचे दिसून येत आहे. या हटके चित्रपटांच्या लाटेत आणखी एकाची भर पडणार असून नुकतेच एका फ्रेश आणि रोमॅंटिक मराठी सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता महेश मांजरेकर प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आलेला ‘एक राधा एक मीरा’ हा घेऊन येत आहेत. मराठीतील चॉकलेट बॉय, हॅंडसम मॅन अभिनेता गष्मीर महाजनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असून अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि सुरभी भोसले या त्याच्या नायिका बनल्या आहेत. चित्रपटात महेश आणि मेधा मांजरेकर हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

- Advertisement -

मृण्मयीचा ग्लॅमरस लुक 

‘कुणाची पूर्ण होते, तर कुणाची अधुरी राहते… तरीही ती प्रेमकहाणीच असते…’, या टॅग लाईनसह या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. उद्या, ७ सप्टेंबर रोजी मृण्मयी देशपांडे हिचा ‘बोगदा’ हा सिनेमा प्रदर्शीत होत असून आजवर ‘नटसम्राट’, ‘मोकळा श्वास’ सारख्या चित्रपटांमधून सिम्पल लुकमध्ये दिसणारी मृण्मयी तिच्या आगामी सिनेमात अगदी ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. तिच्या हेअरस्टाइलमध्ये केलेला बदल, वेस्टर्न आऊटफिट यामुळे प्रेक्षकांना वेगळी मृण्मयी पाहायला मिळणार आहे. तर कृष्णा बनलेला अभिनेता गष्मीर महाजनीचे दोन वेगवेगळे रुप या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री सुरभी भोसले देखील प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट २३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील लव ट्रॅंगल

बॉलीवूडप्रमाणे मराठी चित्रपटांमध्येही प्रेमाचा त्रिकोण दाखवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. यापूर्वीही ‘तू ही रे’, ‘वन वे टिकिट’ सारख्या चित्रपटातून अस्सल रोमॅंटीक कथानक पाहायला मिळाले आहे. प्रेम, त्याग, समर्पण, भेट, विरह, नात्यांमधील संबंध अशा अनेक भावभावनांचा खेळ लव ट्रॅंगलमध्ये दाखवला जातो. एक राधा एक मीरा हा चित्रपटही अशाच नात्यांवर बेतलेला असल्याचे त्यातील संवादातून समजते.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -