‘वहिनी साहेब हे वागणं बर न्हवं…’; Insta फोटोमुळे धनश्री ट्रोल!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगला यातील नंदिनी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगांवकर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खुपच अॅक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळत आहे. धनश्री वारंवार तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करते. मात्र नुकतेच तिने शेअर केलेले फोटो ट्रोलिंगचा विषय बनले आहेत. धनश्रीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स करत तिला ट्रोल केले आहे. धनश्रीने दोन वेगळे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून एकात तिने पिवळ्या रंगाचा तर एकात काळ्या रंगाचा टी शर्ट परिधान केला आहे. यो दोन्ही फोटोंना ट्रोलर्सने संमिश्र प्रतिक्रिया देत काही कमेंट्सही केले आहेत.

धनश्रीने पिवळ्या धम्मक टीशर्टमधले काही फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. यात तिने टीशर्ट परिधान केला असून हातात सॅंडल्स अडकवलेला असा एक फोटो आहे. धनश्रीचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात दोन्ही बाजूंनी कमेंट आलेल्या दिसतात. काहींना तिचा हा अवतार आवडला आहेत तर काहींनी मात्र असा लूक तिला सूट होत नसल्याचे म्हणत ट्रोल केले आहे.

हेही वाचा –

कांद्यासारखीच रेमेडेसिव्हिर निर्यातीवर बंदी घाला – मनसेची मागणी