Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन यंदाचा Valentine Day 'प्रीतम' सोबत

यंदाचा Valentine Day ‘प्रीतम’ सोबत

येत्या १९ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Related Story

- Advertisement -

व्हॅलेंटाईन डे हा तरूणांसाठी स्पेशल दिवस असतो. एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस जगभरात साजरा होतो. व्हॅलेंटाईन डे आणखी द्विगुणीत करण्यासाठी एक नवा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘प्रीतम’ असे या मराठी सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. येत्या १९ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. विझार्ड प्रोडक्शनच्या माध्यमातून एड फिल्म मेकर सिजो रॉकी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pranav Raorane (@pranav_raorane)

- Advertisement -

सिनेमाचे शुटींग कोकणच्या निसर्गम्य पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे. प्रेमाचा अनुभव हा सर्वाचा वेगवेगळा असतो. अशाच एका वेगळ्या प्रेमाची गोष्टी या सिनेमातून पहायला मिळणार आहे. अभिनेता प्रणव रावराणे आणि अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर ही नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दोघांनी या आधी मालिकांचे छोटे पडदे गाजवले आहेत. मात्र आता दोघांनाही सिनेमाच्या पडद्यावर पाहता येणार आहे. नक्षत्रा मेढेंकर चंद्र आहे साक्षीला या मालिकेतून आपल्याला दिसत असते. नक्षत्राला आता मोठ्या पडद्यावर आगमन करत आहे. यांच्यासोबत अभिनेता उपेंद्र लिमये, अजित देवळे, विश्वजीत पालव, समीर खांडेकर, आबा वेलणकर, शिवराज वाळेकर, नयन जाधव, आनंद कारेकर, अस्मिता खटखटे हे कलाकारही दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pranav Raorane (@pranav_raorane)


सिनेमाची गाणीही सुपरहिट असणार आहेत. सिनेमाचे गाणी शंकर महादेवन यांनी केली आहे. तुझ्या रूपाचं चांदण सभोती हे प्रेमगीत शंकर महादेवन यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. हे गाण १४ जानेवारीला रिलीज करण्यात येणार आहे. सिनेमाचे संवाद आणि पटकथा गणेश पंडित यांनी लिहिली आहे. तर सिनेमातील गाणी गुरू ठाकूर यांच्या लेखणीतून सादर झाली आहेत. त्यामुळे सिनेमात दर्जेदार गाण्यांची मेजवानी पहायला मिळणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – मलायका अर्जुनच्या नात्याला ट्रोल करणाऱ्यांना मलायकाचं सडेतोड उत्तर

- Advertisement -