रणवीर पुन्हा शूटिंगवर परतला, रोहित शेट्टीच्या चित्रपटात दिसणार दुहेरी भूमिकेत

Ranveer Singh begins shooting for Rohit Shetty's Cirkus in Mumbai
रणवीर पुन्हा शूटिंगवर परतला, रोहित शेट्टीच्या चित्रपटात दिसणार दुहेरी भूमिकेत

कोरोना काळ सुरू झाल्यामुळे काही काळासाठी मनोरंजन क्षेत्र ठप्प होत. पण ते पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाले आहे. त्यामुळे आता अनेक चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. दरम्यान बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंह मोठ्या पडद्यावर पुन्हा कधी दिसणार आहे, याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. बऱ्याच काळापासून रणवीर कोणत्याच चित्रपटात दिसला नाही आहे. पण आता रणवीर रोहित शेट्टीचा कॉमेडी चित्रपट ‘सर्कस’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

माहितीनुसार, ‘सर्कस’ या चित्रपटात रणवीर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. महबूब स्टुडिओमध्ये चित्रपटच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात रणवीर सिंहसोबत अभिनेत्री पूजा हेगडे आणि जॅकलीन फर्नांडिस आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता वरुण शर्मा विनोदी भूमिका साकारणार आहे.

रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटात रणवीर सिंह दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. शेक्सपिअरच्या ‘प्ले द कॉमेडी ऑफ एरर’ यावर चित्रपट आधारित आहे. एका वृत्तानुसार, या चित्रपटाचे पहिल्यांदा नाव ‘अंगूर’ ठेवले होते. पण नंतर कॉपीराईटच्या भीतीमुळे चित्रपटाचे नाव ‘सर्कस’ ठेवण्यात आले. ‘सर्कस’ हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टी सध्या या चित्रपटावर जास्त काम करत आहे. दरम्यान रणवीर चाहते त्याच्या ‘८३’ चित्रपट येण्याची वाट पाहत आहे. या चित्रपटात रणवीर बायको दीपिका पादुकोणसोबत काम केले आहे.


हेही वाचा – लवकरच ‘टॉम अँड जेरी’ नव्या ट्विस्टसह प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर पाहून चाहते झाले इमोशनल