घरमनोरंजन'या'साठी टीव्हीवर पुन्हा-पुन्हा दाखवतात सूर्यवंशम...

‘या’साठी टीव्हीवर पुन्हा-पुन्हा दाखवतात सूर्यवंशम…

Subscribe

सूर्यवंशम झाला ‘१९’ वर्षांचा !

सूर्यवंशम हा सुपरहिट सिनेमा १९ वर्षांपूर्वी ठीक आजच्याच दिवशी, अर्थात २१ मे १९९९ रोजी प्रदर्शित झाला होता. आज हा सिनेमा १९ वर्षांचा झाला आहे. सूर्यवंशम सिनेमा कोणाला ठाऊक नाही असे चित्र दुर्मिळच म्हणावे लागेल. कारण हा सिनेमा गेल्या अनेक वर्षांपासून अगदी आजच्या तारखेपर्यंत साततत्याने टीव्हीवर दाखवला जात आहे. त्यामुळे ९० च्या दशकातील लोकांपासून ते आताच्या पिढीच्या मुलांपर्यंत सर्वांनाच सूर्यवंशम सिनेमा ठाऊक आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सिनेमात डबल रोल साकारला आहे.

बॉक्स ऑफिसवर मात्र अपयशी

आश्चर्याची बाब म्हणजे अनेक वर्षांपासून टीव्हीवर सुपरहिट ठरत आलेला सूर्यवंशम, बॉक्स ऑफिसवर मात्र चांगलाच आपटला होता. १९९९ साली आलेल्या या सिनेमाला त्यावेळी लोकांची अजिबात पसंती मिळाली नव्हती.

- Advertisement -

सेट मॅक्सचे दुसरे नाव- सूर्यवंशम

सूर्यवंशम हा सिनेमा गेल्या १९ वर्षांपासून सोनी ग्रुपच्या सेट मॅक्स या वाहिनीवर सातत्याने दाखवला जात आहे. त्यामुळे सेट मॅक्स म्हणजे सूर्यवंशम असे जणू समीकरणच बनले आहे. मात्र यामागे कारणही तसेच खास आहे. सूर्यवंशम सिनेमा १९९९ साली रिलीज झाला होता आणि त्याचवर्षी सेट मॅक्स ही वाहिनी देखील सुरु झाली. या वाहिनीने स्पर्धेत आपलं स्थान उंचवण्यासाठी म्हणून लगेचच सूर्यवंशम सिनेमाच्या प्रसारणाचे सर्व हक्क विकत घेतले. मात्र त्यावेळी हा करार तब्बल १०० वर्षांसाठी करण्यात आला असल्यामुळे आजही सेट मॅक्स वाहिनीवर हा सिनेमा दाखवला जातो.

फोटो सौजन्य- Troll Bollywood/फेसबुक

सोशल मीडियावर ट्रोलिंग

एक नाही दोन नाही तर तब्बल १९ वर्षे सातत्याने एकाच वाहिनीवर प्रसारित होत राहिल्याने, सूर्यवंशम सिनेमाला सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल करण्यात आले आहे. आजच्या घडीलाही सूर्यवंशमला आणि त्यातील पात्रांना इंटरनेटवर खूप ट्रोल केले जाते. त्यातही हिरा ठाकूर आणि त्याचे वडील भानूप्रताप सिंह ही पात्रे नेटिझन्सची लाडकी आहेत. सेट मॅक्सवर IPL सामने सुरु झाले की हिरा ठाकूर गोव्याला पळून जातात ‘ तसंच ‘IPL चा सीझन संपला आता पुन्हा सूर्यवंशमची गाडी सुरु..’ अशाप्रकारचे ट्रोलिंग इंटरनेटवरुन वारंवार होत असते.

- Advertisement -

 

फोटो सौजन्य- FilmyGyan / फेसबुक
फोटो सौजन्य – फेसबुक

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -