घरफिचर्सथिएटर ऑफ रेलेवन्स रंगप्रशिक्षण

थिएटर ऑफ रेलेवन्स रंगप्रशिक्षण

Subscribe

‘थिएटर ऑफ रेलेवन्स’च्या नाट्यकार्यशाळेत सहभागींना मंच, नाटक आणि जीवनाशी संबंध, नाट्य लेखन, अभिनय, दिग्दर्शन, समीक्षा, नेपथ्य, रंगशिल्प, रंगभूषा इत्यादी विभिन्न रंग दृष्टीकोनांवर प्रशिक्षित केले जाते. मागील 26 वर्षात 16 हजारापेक्षा जास्त रंगकर्मींनी 1000 कार्यशाळेत भाग घेतला आहे . भांडवलशाहीला बळी पडलेले कलाकार कधीही आपली कलात्मक सामाजिक जबाबदारी घेत नाहीत त्यामुळे “कला ही कलेसाठी ” या चक्रव्यूहात फसले आहेत आणि भोगवादी कलेच्या संभ्रमात फसून नष्ट होत आहेत.

प्रशिक्षण म्हणजे ज्ञानार्जन. नवीन गोष्टी शिकण्याचं माध्यम. रंग प्रशिक्षण म्हणजे विचारांच्या प्रगल्भतेचे प्रशिक्षण, कलेचे व्यापक रूप. त्याचा मूळ उद्देश आणि नाट्य कलेच्या माध्यमातून वैयक्तिक विकासासह सामाजिक-वैचारिक परिवर्तनाची मुळे रुजवणे.

- Advertisement -

भारतीय संस्कृतीमध्ये नाटकाला अनन्य साधारण महत्त्व आहे. नाटक आपल्या सामाजिक व्यवस्था, संस्कृती यांचा आरसा दर्शवते. विशेषतः मराठी रंगभूमी आणि बंगाली रंगभूमीला विशेष दर्शक संस्कार आहेत. आपल्याकडे अशी बरीच उदाहरणे आहेत की नाटकामुळे व्यक्तिगत बदल घडले. महात्मा गांधीनी राजा हरिश्चंद्र हे नाटक पाहून जीवनभर सत्य बोलण्याचा धडा घेतला.

म्हणून नाटक हे सतत जिवंत राहणे आवश्यक आहे आणि काळाची गरज आहे. नाट्याभिनय करणे ही बहुतांश व्यक्तींची सुप्त इच्छा असते. अभिनय हा अभिजात असतो आणि त्याला मार्गदर्शनाची ही गरज असते. नाटक हे आपले पूर्वापार चालत आलेले प्रसारासाठीचे व संवादाचे माध्यम आहे, म्हणून आज भारतात वेगवेगळ्या संस्था व समूह नाट्य प्रशिक्षण देतात. पण या नाट्य प्रशिक्षणामधून नाटक खरंच जिवंत राहते का? भारतातील ज्या मोठमोठ्या नावाजलेल्या नाट्य प्रशिक्षण संस्था आहेत, ज्या राष्ट्रीय सांस्कृतिक संवर्धनाच्या नावावर काम करतात तिथे नाटक पेरले तर जाते, पण नाटक उगवते का ?

- Advertisement -

नाट्य क्षेत्रात जेव्हा मी आले, तेव्हा कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण नव्हते घेतले, पण ऐकीव आणि मित्रमैत्रिणींच्या अनुभवातून दिसून येत होते, कळून येत होते. या प्रशिक्षण पद्धतीत तुम्ही स्वतःला सतत कसे presentable, प्रदर्शन स्वरूप दिसाल याकडे जास्त कल होता, म्हणजे प्रदर्शनात्मक वस्तू व्हा, कलेचे मूळ सत्व राहते बाजूला ! मुळात नाटक म्हणजे मेंदूचे कार्य, विचारांचे कार्य त्याला केवळ वरवरचा चंदेरी मुलामा चढवून कसे चालेल, खोलवर काम व्हायला हवे असे सतत वाटत होते. अशाच शोधात चाचपडत असताना TOR रंगसिध्दांताची ओळख झाली.
या रंग सिद्धांताच्या नाटकांमध्ये काम करत असताना माझे खरे रंगप्रशिक्षण सुरू झाले.

थिएटर ऑफ रेलेवन्सचे नाट्य प्रशिक्षण केवळ व्यक्तिचित्रण आणि मनोरंजन इतकेच सीमित न राहता सक्षमीकरणावर भर देते. कलाकार म्हणून घडता घडता आधी एक माणूस म्हणून घडण्याची सुरुवात होते. भाव-अभिनय-नाट्यसौंदर्य यासोबत वैचारिक पाया भक्कम करण्यासाठी थिएटर ऑफ रेलेवन्समध्ये कलाकार हा विचार लिहिण्यासाठी, मांडण्यासाठी, प्रस्तुत करण्यासाठी प्रेरित होतो.

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य प्रशिक्षणामध्ये सर्वप्रथम unlearn केले जाते. ज्याप्रमाणे शेतकरी आधीचे पीक कापून पुन्हा शेत नांगरतो जेणे करून नवीन विचारांचे बियाणे रुजवता येतील. शेतकरीदेखील जशी आहे तशी जमीन स्वीकारत नाही. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या बौद्धिक सुपिकतेसाठी वैचारिक नांगरणी येथे केली जाते.

थिएटर ऑफ रेलेवन्सच्या नाट्यकार्यशाळेत सहभागींना मंच, नाटक आणि जीवनाशी संबंध, नाट्य लेखन, अभिनय, दिग्दर्शन, समीक्षा, नेपथ्य, रंगशिल्प, रंगभूषा इत्यादी विभिन्न रंग दृष्टीकोनांवर प्रशिक्षित केले जाते. मागील 26 वर्षात 16 हजारापेक्षा जास्त रंगकर्मींनी 1000 कार्यशाळेत भाग घेतला आहे . भांडवलशाहीला बळी पडलेले कलाकार कधीही आपली कलात्मक सामाजिक जबाबदारी घेत नाहीत त्यामुळे “कला ही कलेसाठी ” या चक्रव्यूहात फसले आहेत आणि भोगवादी कलेच्या संभ्रमात फसून नष्ट होत आहेत.” थिएटर ऑफ रेलेवन्स”ने “कलेसाठी कला” असणा-या साम्राज्यवादी आणि भांडवलशाही विचारांच्या चक्रव्यूहाला आपली तत्त्व आणि सार्थक प्रयोगांनी तोडले आहे आणि कैक संकल्पनांना रुजवले आहे व अभिव्यक्त केले आहे.

“थिएटर ऑफ रेलेवन्स रंग सिद्धांतानुसार रंगकर्म दिग्दर्शक आणि अभिनेता केंद्रित होण्याऐवजी” लेखक आणि प्रेक्षक केंद्रित असावं, कारण प्रेक्षक हाच सर्वात मोठा आणि शक्तिशाली रंगकर्मी आहे. परफॉर्मर आणि दर्शक ही आमची मूलभूत आणि पायाभूत आवश्यकता आहे. प्रेक्षकांच्या मुद्यांना आणि त्यांच्या समस्यांनाच या नाट्य सिद्धांताने आपले मिशन बनवले.

थिएटर ऑफ रेलेवन्सचे सिद्धांत

१. असा रंगकर्म ज्याची सर्जनशीलता विश्वाला मानवीय आणि सुंदर बनवण्यासाठी प्रतिबद्ध आहे.

२.कला कलेसाठी न राहता समाजाच्याप्रति आपल्या जबाबदारीचे पालन करेल आणि लोकांच्या जीवनाचा हिस्सा बनेल .

३. जे मानवीय गरजांना पूर्ण करेल आणि स्वतःला अभिव्यक्ती माध्यमाच्या स्वरूपात व्यक्त करेल.

४. जो स्वतःला परिवर्तनाच्या माध्यम स्वरुपात स्वतःला शोधेल आणि रचनात्मक बदलावाची प्रक्रिया पुढे नेईल.

५. असे रंगकर्म जे मनोरंजनाची सीमा तोडून जीवन जगण्याचे स्त्रोत किंवा पद्धती बनेल.

थिएटर ऑफ रेलेवन्स मधले रंगप्रशिक्षण हे केवळ चार भिंतीत अडकून न राहता नैसर्गिक ठिकाणी होते. जिथे निसर्गाच्या माध्यमातून मानवी तत्वांची ओळख होते. आत्मशुद्धीकरण प्रक्रियेला सुरुवात होते आणि एक उत्कृष्ट कलाकारासोबत एक सर्व संपन्न व्यक्तीही घडते. वर्षानुवर्षं चालत आलेला तोच तो अभ्यासक्रम आणि तेच ते विषय, यांच्यापासून वेगळे, व्यापक आणि नाविन्यपूर्ण विषयांवर मंथन होते.

इतर नाट्य प्रशिक्षणात शिकवले जाते, म्हणून तिथे एक शिक्षक आणि बाकी विद्यार्थी असतात, पण थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य पद्धतीमध्ये खुद से सीखो, एक दुसरे से सीखो, मिलकर सीखो ही प्रक्रिया अवलंबली जाते.

थिएटर ऑफ रेलेवन्सच्या प्रशिक्षणाचे वैशिष्ठ्य म्हणजे इथे प्रत्येक मुद्रा, कृती, भाव याला विचारांशी आणि उद्देश्याशी जोडले जाते. म्हणून आपण कुठलीही मुद्रा किंवा कृती का करत आहोत याचे उत्तर कलाकाराला माहीत असते.

Stylization ला इतर नाट्य प्रशिक्षणात खूप महत्व दिले जाते, ज्यात कलाकाराची कलात्मकता संपते, थिएटर ऑफ रेलेवन्स stylization ला खोडते व व्यक्तीच्या कलात्मक संवेदनांना प्राधान्य देते.

थिएटर ऑफ रेलेवन्स हे सामान्य प्रशिक्षण नाही, माणसातील कलात्मकता, स्पंदन, विचार, दृष्टी, सकारात्मक भाव या सगळ्या आयामांनी कलाकाराला उन्मुक्त करते आणि सुंदर आयुष्य जगण्यास प्रेरित करते.

उदाहरणार्थ-थिएटर ऑफ रेलेवन्सच्या कार्यशाळेत निसर्गाच्या सान्निध्यात असताना उत्प्रेरक मंजुल भारद्वाज यांनी आम्हा कलाकारांना निदर्शनास आणून दिले की-पाण्याचे बाष्पात रूपांतर होत असताना कितीसा वेळ लागतो? त्याचप्रमाणे बदलाचा विचार येण्यासाठी एक क्षणच पुरेसा असतो, ही शिकवण प्रत्यक्ष निसर्गाने आम्हाला दिली. असे प्रत्यक्ष प्रशिक्षण पाठ्यपुस्तकीय ज्ञानातून मिळत नाही. म्हणूनच थिएटर ऑफ रेलेवन्सचे प्रशिक्षण वैशिष्ठ्यपूर्ण ठरते.
थिएटर ऑफ रेलेवन्समध्ये खोट्या stardom पेक्षा जमिनीशी connected राहण्याचे प्रशिक्षण मिळते.
थिएटर ऑफ रेलेवन्समधल्या प्रत्येक नाटकातून मिळणारा ‘रचनात्मक-कलात्मक बोध’ प्रत्यक्ष आयुष्यात उतरवला जातो, इथे नाटक रंगमंचावर केले जाते प्रत्यक्ष जीवनात नाही. म्हणूनच थिएटर ऑफ रेलेवन्स प्रशिक्षणामध्ये आधी माणूस होण्याच्या प्रक्रियेला महत्त्व दिले जाते. कारण माणूस जितका खरा तितकी त्याची कला खरी !

“थिएटर ऑफ रेलेवन्स” ने जीवनाला नाटकाशी जोडून कलात्मक चेतनेचा उदय करून त्याला प्रेक्षकांशी जोडले आहे. थिएटर ऑफ रेलेवन्सच्या कलात्मक प्रस्तुती कुठल्याच विशेष, प्रतिष्ठित रंगमंचापर्यंत मर्यादित नाही किंवा अशा रंगमंचाच्या चौकटीत अडकत नाहीत, कुठल्याच सरकारी, गैरसरकारी, देशी, विदेशी संस्थानांवर वित्त पोषित नाही. या नाट्य सिद्धांताचे मूळ ‘धन’ आहे ह्याचे उद्देश्य आणि मूळ ‘संसाधन’ आहेत. ‘प्रेक्षक’, ज्यांच्या सहयोग आणि सहभागीतेने हे नाट्य तत्व परिस्थितीच्या विरोधात जाऊन ‘माणुसकी/मानवतेचा’ आवाज बनून, राष्ट्रीय आणि वैश्विक स्थरावर आपले तत्व आणि सकारात्मक प्रयोगांमधून एक उत्कृष्ट, सुंदर आणि मानवीय विश्वाची निर्मिती करत आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ नाट्य सिद्धांत सांस्कृतिक चेतनेचा निर्माण करून सांस्कृतिक क्रांती आणण्यासाठी प्रतिबद्ध आहे !

-अश्विनी नांदेडकर (रंगकर्मी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -