घरमुंबईरेषा ‘विकास’ची....भाषा ५० वर्षांची!

रेषा ‘विकास’ची….भाषा ५० वर्षांची!

Subscribe

विकास सबनीस यांच्या ५० वर्षांच्या कारकीर्दीचा विशेष गौरव, सावरकर सभागृहात रंगणार सोहळा

प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या व्यंगचित्र कारकीर्दीला तब्बल पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल त्यांचा एक हृद्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून, आघाडीचे व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी ‘गाणार्‍या रेषा’ हा विकास सबनीस यांचा गाण्यांच्या पार्श्वभूमीवरील कार्टून्सचा विशेष कार्यक्रमही सादर होणार आहे.

‘रेषा विकासची भाषा ५० वर्षांची’ या संकल्पनेखाली सबनीस यांची पाच दशकांची कारकीर्द गौरवान्वित होणार आहे. बुधवार दिनांक २० फेब्रुवारी २०१९ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता दादर येथील वीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. ‘कार्टूनिस्टस कंबाईन’चे अध्यक्ष संजय मिस्त्री, ज्येष्ठ पत्रकार शिरीष कणेकर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार यशवंत सरदेसाई, ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रय पाडेकर यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ही ‘जीवनगाणी’ आणि ‘स्वरगंधार’ या संस्थांची संयुक्त संकल्पना असून, कार्यक्रमाचे आयोजनही त्यांनीच केले आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांना ‘प्रथम येणार्‍यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार खुला प्रवेश दिला जाणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन स्मिता गवाणकर करणार आहेत. एवढ्या ज्येष्ठ आणि प्रख्यात व्यंगचित्रकाराचा गौरव करण्याची संधी आम्हाला मिळते आहे, हे आम्ही आमचे भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया कार्यक्रमाचे आयोजक प्रसाद महाडकर आणि मंदार कर्णिक यांनी काढले आहेत.

- Advertisement -

आपल्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीबद्दल बोलताना सबनीस म्हणाले, १९६८ मध्ये माझ्या कारकीर्दीची सुरुवात झाली. ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये आर के लक्ष्मण आणि ‘मार्मिक’मध्ये बाळासाहेब ठाकरे यांची कार्टून्स बघून मी प्रभावित होत असे. बाळासाहेबांची कार्टून्स आणि त्यामागील त्यांचा राजकीय विचार आणि त्यामागील विचारशक्ती हे मला प्रभावित करत असत. त्यामुळेच मी राजकीय कार्टूनिस्ट होण्याचे ठरवले आणि स्वतः शिकत गेलो. ही सुरुवात प्राथमिक शाळेपासूनच झाली. हे माझ्या करियरचे ४९वे वर्ष असून, पुढील वर्षी पन्नास वर्षे पूर्ण होतील. ते पुढे म्हणाले, मी जेव्हा कार्टूनिस्ट म्हणून करीयरची सुरुवात केली तेव्हा मला माझ्या मित्रांनी एखादी मीडिया एजन्सी जॉईन करून कमर्शियल कार्टूनिस्ट होण्याचा सल्ला दिला. त्यातून मला चांगले पैसे मिळाले असते, पण मला मात्र पॉलिटिकल कार्टूनिस्टच व्हायचे होते. कार्टूनिस्ट म्हणून माझा सर्वाधिक मोलाचा क्षण म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला त्यांचा वारसदार म्हणून ‘मार्मिक’मध्ये कार्टून काढण्याची संधी दिली तो. मी त्यांच्या कॉलमसाठी कार्टून काढत असे. तोच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -