जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- क्षुल्लक कारणाने तुमचे मन उदास, दुःखी होऊ शकते. खाण्याची काळजी घ्या. वस्तू सांभाळा.

वृषभ :- मनाची एकाग्रता वाढेल. ठरविलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वासाने चर्चा करता येईल.

मिथुन :- धंद्यात जम बसेल. मागिल येणे वसूल करा. कला क्षेत्रात झालेली ओळख फायदेशीर ठरेल.

कर्क :- वरिष्ठांना न दुखावता तुमचे मत त्यांना सांगा. कायद्याचे पालन करा. गोड बोलून धंदा मिळवा.

सिंह :- दौर्‍यात ताणतणाव होऊ शकतो. खाण्याचे हाल होतील. प्रवासात नवीन ओळख होईल; पण सावध रहा.

कन्या :- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. घरातील लोकांना खूश करण्यासाठी प्रयत्न कराल. गोड खाण्यास मिळेल.

तूळ :- ईश्वरी चिंतनात मनाची एकाग्रता होईल. मन खूश करणारी बातमी मिळेल. सन्मान मिळेल.

वृश्चिक :- मनावरील ताण हलका होईल. मौज-मजा कराल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. नवीन ओळख होईल.

धनु :- रागावर ताबा ठेवा. तुमच्यावर आरोप होण्याची शक्यता आहे. जुन्या आठवणीने मन भरून येईल.

मकर :- कुटुंबात आनंदी रहाल. चांगली बातमी मिळेल. धंदा वाढेल. महत्त्वाचे काम आजच करून घ्या.

कुंभ :- तुमच्या विचारांना जास्त प्रतिसाद मिळण्यास वेळ लागेल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. वाहन जपून चालवा.

मीन :- महत्त्वाची भेट आजच घ्या. चर्चा यशस्वी होईल. कला-साहित्यात चांगले यश मिळेल. आनंदी रहाल.