राशीभविष्य : गुरुवार, २३ जानेवारी २०२०

Mumbai
Horoscope 44
राशीभविष्य

मेष : निर्णय घेण्याची वेळ येईल. मनाची द्विधा अवस्था होऊ शकते. भलत्या व्यक्तीसाठी खर्च कराल. धंदा मिळेल.

वृषभ : शेजार्‍यांबरोबर वाद होईल. प्रवासात सावधपणे वाहन चालवा. कायदा मोडू नका. खर्च करावा लागेल.

मिथुन : आजचे काम आजच करा. आळस नको. नवीन परिचय होईल. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची चांगली संधी मिळेल.

कर्क : दुसर्‍यावर अवलंबून राहू नका. तुमच्या गरजेच्या वेळेला पटकन मदत मिळणारे थोडे कठीण होईल.

सिंह : भेट घेण्यास चांगला दिवस. तुमचे मत स्पष्टपणे मांडता येईल. जवळची माणसे मदत मागण्यासाठी येतील.

कन्या : कठीण असलेले काम आजच पूर्ण करा. जीवनसाथीच्या प्रगतीची बातमी मिळेल. कोर्ट केसमध्ये यश मिळेल.

तूळ : विचारांना दिशा मिळेल. कल्पक वृत्ती वाढेल. नवीन काही करण्याचा विचार कराल. मैत्री होईल.

वृश्चिक : आनंदी रहाल. शेअर्समध्ये फायदा होईल. मित्र भेटतील. फेरफटका मारण्याने विचारांना चालना मिळेल. धंदा मिळेल.

धनु : कामातील अडचणी दूर होतील. जीवनसाथीचे सहाय्य मिळेल. प्रगतीकारक दिवस राहील. स्पर्धेत यश मिळेल. प्रसिद्धी वाढेल.

मकर : शांतपणे नव्या कामाचा विचार करा. मन अस्थिर राहील. प्रतिष्ठीत व्यक्तीची भेट घेण्यास जा, परंतु संयम ठेवा.

कुंभ : नावलौकिक मिळेल. धंदा वाढेल. मनाप्रमाणे निर्णय घेतल्याचे समाधान मिळेल. प्रवास होईल. कामाचा आळस नको.

मीन : महत्त्वाचे काम करा. अधिकार मिळेल. धंदा वाढेल. पैसा मिळेल. खर्च वाढेल. खरेदी-विक्रीत लाभ होईल.