राशीभविष्य : गुरुवार,१२ नोव्हेंबर २०२०

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : तुमचे विचार सर्वांना मान्य होतील. नेतृत्व करावे लागेल. स्पर्धा जिंकाल. ओळखीचा उपयोग करून घेता येईल.

वृषभ : वरिष्ठांना न दुखावता काम करा. प्रगती होईल. प्रवासात घाई करू नका. धंद्यात गोड बोला.

मिथुन : दुपारनंतर तुमचे काम होईल. संयम ठेवा. मेहनत करण्याची तयारी करा. मोहाला फसू नका.

कर्क : किरकोळ अडचण काम करतांना येईल. प्रवासात सावध रहा. कायद्याचे पालन करा. राग आवरा.

सिंह : वाटाघाटीत यश मिळेल. धंद्यात फायदा होईल. जुने मित्र पैशाची मागणी करतील. कोर्टकेस जिंकाल.

कन्या : तुमच्या कार्याला योग्य दिशा देता येईल. तुम्ही चौफेर लक्ष ठेवा. नविन परिचय वाढवा. धंदा वाढेल.

तूळ : सकाळी झालेला तणाव दुपारी कमी होईल. धंद्यात सुधारणा होईल. स्पर्धेत जिंकाल केस जिंकाल.

वृश्चिक : संमिश्र घटना घडतील. प्रवासात सावध रहा. धंद्यात बोलणी करतांना संयमाने चर्चा करा.

धनु : तणाव कमी होईल. समस्या कमी करता येईल. धंद्यात वाढ करण्यात यश मिळेल. मान-प्रतिष्ठा मिळेल.

मकर : अडचणीवर मात करावी लागेल. लोकांच्या मनात संशय निर्माण करून दिला जाईल. सावध भूमिका घ्या.

कुंभ : महत्त्वाची कामे करून घेता येतील. कला-क्रीडा-साहित्यात प्रेरणादाई घटना घडेल. केस जिंकाल.

मीन : धंद्यात प्रगती करता येईल. थकबाकी वसूल करा. प्रतिष्ठा मागून मिळत नाही. कष्ट घ्या. राग आवरा.