पीसीओडीकडे दुर्लक्ष नको – भाग २

Mumbai
Pcod

पीसीओडी / पीसीओएस उपचार

आजार होऊ नये म्हणून करण्याचे उपाय
सुयोग्य जीवनशैली = योग्य व वेळेवर घरचा पोषक आहार हे पीसीओडी आजाराचे उपचार सूत्र म्हणावे.
जंक फूड टाळणे, बेकरीचे, जड पदार्थ न खाणे, शक्यतो ताजे गरम रुचकर पारंपरिक अन्नपदार्थ मुलींना दिले पाहिजेत. विशेषत: शाळेचा डबा देताना यानुसार योग्य नियोजन केले पाहिजे. यात एक महत्त्वाची गोष्ट जी आजकाल अति जागरुकतेमुळे चुकू शकते ती म्हणजे लागोपाठ दिला जाणारा जड आहार!

खेळ व इतर व्यायाम
१) प्रत्येक मुलीने दिवसातील ठरावीक वेळ हा खेळण्यासाठी / व्यायामासाठी राखून ठेवलाच पाहिजे.
२) शाळेत खेळाच्या तासाला मैदानावर न खेळता झाडाखाली अथवा वर्गात बसून राहणे चुकीचे आहे. अपवाद फक्त आजारपणाचा!
तसेच अभ्यास व इतर छंदवर्ग याचे योग्य नियोजन करून आपापल्या आवडीनुसार बॅडमिंटन, पोहणे, टेनिस इत्यादीसाठी वेळ काढणे आवश्यक आहे.
३) वजन व उंचीचे योग्य प्रमाण असणे आवश्यक आहे. काही विशिष्ट योगप्रकार देखील यासाठी उपलब्ध आहेत.

तणाव व्यवस्थापन
जीवनशैलीचे व तणावाचेदेखील नियोजन करणे हे अगदी शाळकरी मुलींमध्येही आवश्यक झाले आहे.
यामध्ये ताणतणाव टाळणे महत्त्वाचे आहे. यात अगदी लहानसहान गोष्टींचासुद्धा यात समावेश असतो. ज्याचे महत्त्व बरेचदा पालकांच्या लक्षात येत नाही.

डॉ. गंधाली देवरुखकर, स्त्री रोग विशेषज्ज्ञ आणि प्रसूतीशास्त्रज्ञ

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here