LockDown: ‘वर्क फ्रॉम होम’ चा जाणवतोय मानसिक तणाव; करा ‘हे’ सोपे उपाय!

जाणून घ्या तणावमुक्त राहण्याचे सोपे उपाय

Mumbai

कोरोनामुळे माणसांच्या जीवशैलीत तसेच कार्य पद्धत देखील बदल झाला आहे. कोरोना दरम्यान बर्‍याच कंपन्या ‘वर्क फ्रॉम होम’ ही संस्कृती स्वीकारत असल्याचे दिसत आहे. ही संस्कृती किती काळ टिकेल किंवा ती स्वीकारताना कोणत्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे, हे देखील समजून घेणं तितकंच आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात हे सिद्ध झाले आहे की, येणाऱ्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ करणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे सतत घरात राहून काम करणं हे तणावाचं देखील ठरू शकतं. मात्र ते टाळणं देखील महत्त्वाचे आहे. याकरता मानसोपचारतज्ज्ञ डॉ.संदीप वोहरा यांनी काही उपाय सांगितले आहेत.

१ तास काम करताना १० मिनिटांचा ब्रेक घ्या

‘वर्क फ्रॉम होम’ करत असणाऱ्या लोकांमध्ये चिडचिडेपणा, उदासीनता किंवा निद्रानाश यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये उत्तम संतुलन राखणं फार महत्वाचे ठरणार आहे. तासंतास सतत काम करण्याऐवजी १ तास काम केल्यावर १० मिनिटांचा ब्रेक आवर्जून घ्या. तसेच ऑनलाइन काम करताना होणाऱ्या संवादात ब्रेक ठेवणं देखील आवश्यक आहे.

आपल्या माणसांच्या संपर्कात रहा

कुटुंबातील सदस्यांसह वेळ घालवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांशी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तेवढाच संपर्क साधा. जेणेकरून मन फ्रेश राहण्यासाठी आपल्या माणसांशी संवाद साधणं हे देखील महत्वाचं आहे. माणूस हा एक सामाजिक घटक असल्याने त्याने समाजाशी संपर्क साधून जुळवून घेणं फार आवश्यक आहे.

किमान ६ ते ९ तास पुरेशी झोप हवी

लॉकडाऊन दरम्यान, घरात राहणाऱ्या लोकांना पुरेशी झोप असणं हे देखील फार महत्वाचे आहे. रात्री किमान ६ ते ९ तास पुरेशी झोप घेतली पाहिजे. तसेच व्यायामाद्वारे स्वत: ला शारीरिक दृष्ट्या सक्रिय ठेवून या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास ‘वर्क फ्रॉम होम’ चा तुमच्या मेंदूवर परिणाम आणि कामाचा तणाव जाणवणार नाही, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ.संदीप वोहरा यांनी सांगितले आहे.


CoronaVirus: मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करा, कोरोनाला दूर ठेवा!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here