मतिमंद तरूणीवर सामुदायिक बलात्कार

निफाड तालुक्यातील करंजगाव येथे मानसिक विकलांग २० वर्षीय तरूणीवर पाच नराधमांनी सलग दोन महिन्यापासून सामुदायिक बलात्कार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे.

Nashik
Rape Case
प्रातिनिधिक फोटो

निफाड तालुक्यातील करंजगाव येथे मानसिक विकलांग २० वर्षीय तरूणीवर पाच नराधमांनी सलग दोन महिन्यापासून सामुदायिक बलात्कार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून नराधम बलात्कार करत होते. सदर पिडित तरूणी दोन दिवसापूर्वी पोटदुखीच्या कारणाने नाशिक येथे जिल्हा रूग्णालयात आईसोबत उपचारासाठी गेली असता तेथील डॉक्टरांनी गरोदर असल्याचे सांगितले. यांनतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. ३० मे रोजी सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्याकडे मुलीने संपूर्ण घटना कथन केली. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून मल्हार माधव निरभवने (वय ४८), राजेश उर्फ तबाजी सिताराम निरभवने (वय ३५), भाऊसाहेब उर्फ भावश्या सुर्यभान हांडे (वय ४८), दौलत विठ्ठल निरभवने (वय ४६) जॉकी उर्फ संजय उन्हवणे (वय २१, सर्व रा. करंजगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांवर सामुदायिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, शिरदावडे पुढील तपास करत आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी माधव पडिले यांनी भेट घेवून तपासाबद्दल मार्गदर्शन केले.