घरमहाराष्ट्रनाशिकपालिका अधिकार्‍यांचे खांदेपालट; अतिरिक्त आयुक्तपदी डोईफोडे, डॉ. नलावडे

पालिका अधिकार्‍यांचे खांदेपालट; अतिरिक्त आयुक्तपदी डोईफोडे, डॉ. नलावडे

Subscribe

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, उपायुक्त रोहिदास बहिरम, कामगार कल्याण अधिकारी अशोक वाघ या तीन जुन्या अधिकार्‍यांसह काही कर्मचारी शुक्रवारी (ता. ३१) सेनानिवृत्त झाले

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, उपायुक्त रोहिदास बहिरम, कामगार कल्याण अधिकारी अशोक वाघ या तीन जुन्या अधिकार्‍यांसह काही कर्मचारी शुक्रवारी (ता. ३१) सेनानिवृत्त झाले. महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे रिक्त असून त्यावर महेश डोईफोडे आणि डॉ. संदीप नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुनीता कुमावत यांच्याकडे सहाय्यक आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. मुख्य लेखापरिक्षक महेश बच्छाव यांच्याकडे २१ फेब्रुवारी २०१८ पासून उपायुक्त प्रशासन या पदावरील नियमीत प्रशासन, आपले सरकार व लोकशाही दिन या पदांचा असलेला अतिरिक्त कार्यभार होता. आता हा कार्यभार सुनिता कुमावत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्तपदी जयश्री सोनवणे यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी रोहिदास बहिरम यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलन, फेरीवाला धोरण, राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान या विभागाचा कार्यभार होता. आता तो सोनवणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

- Advertisement -

उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग प्रमुख शिवाजी आमले यांच्याकडे समाजकल्याण, महिला व बालकल्याण, अपंग कल्याण, कामगार कल्याण, निवडणूक व जनगणना, ग्रंथालय व वृत्तपत्र, अभिलेख कक्ष, माहिती अधिकार, इतर मागासवर्गीय कल्याण समिती, विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती, अनुसूचित जाती व जमाती कल्याण समिती तसेच अन्य सर्व मागासवर्गीय जाती समिती विषयक कामकाज, विशाखा समिती, आधारकार्ड, राजशिष्ठाचार व जनसंपर्क विभाग, क्रीडा विभाग, विधी विभाग आदी कार्यभार सोपवण्यात आला आहे. उपअभियंता नितीन पाटील यांच्याकडे नवीन नाशिकच्या विभागीय अधिकारी पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर उपअभियंता रविंद्र धारणकर यांच्याकडे नाशिक पूर्व विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -