घरमहाराष्ट्रनाशिकसायकल ट्रॅक, रुग्णालय, जलतरण तलाव, क्रीडांगणाचे मंगळवारी भूमिपूजन

सायकल ट्रॅक, रुग्णालय, जलतरण तलाव, क्रीडांगणाचे मंगळवारी भूमिपूजन

Subscribe

आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून मध्य नाशिक मतदार संघातील ४४.५ कोटी खर्चाच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा वन; वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी ५ मार्चला होणार आहे.

आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून मध्य नाशिक मतदार संघातील ४४.५ कोटी खर्चाच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा वन; वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी ५ मार्चला होणार आहे. यानिमित्त रात्री ८ ला हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

इंदिरानगर येथे साईनाथनगर चौफुली ते वडाळा चौफुलीपर्यंत २.५ कोटी रुपये खर्च करून सायकल ट्रॅक साकारण्यात येणार आहे. या ट्रॅकला दिवंगत सायकलपटू जसपालसिंग बिर्दी यांचे नाव देण्यात आले आहे. ट्रॅकचे भूमिपूजन सायंकाळी ७ ला होईल. भाभानगर येथील सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय २५ कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येणार आहे. ९३२९ चौरस फुटाच्या या इमारतीत आयसीयू, शस्त्रक्रिया विभाग, बाल चिकित्सा कक्ष, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया विभाग, शस्त्रक्रिया पश्चात कक्ष, सामान्य कक्ष, सोनोग्राफी, प्रयोगशाळा, रक्तपेढी, क्ष किरण, समुपदेशन आणि चाचणी केंद्र, प्रशासकीय कार्यालय आदींची व्यवस्था असेल. रुग्णालयाचे भूमिपूजन सायंकाळी ७.३०ला होईल. गंगापूर रोडवरील आकाशवाणी जॉगिंग ट्रॅकच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाचे भूमिपूजन सायंकाळी ७.४५ ला होणार आहे. या तलावासाठी ५ कोटी खर्च होणार आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर १२ कोटी रुपये खर्च करून जागतिक दर्जाचे क्रीडांगण विकसित करण्यात येणार आहे. यात ७.५ मीटर रुंदीचा मातीचा जॉगिंग ट्रॅक, ३ मीटर रुंदीचा सायकल ट्रॅक, योगासाठी स्वतंत्र जागा, ग्रीन जीम, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र जागा, फुटबॉलसाठी स्वतंत्र मैदान, क्रिकेटच्या सरावासाठी नेट, महिला व पुरुषांसाठी ई- स्वच्छता गृह, लहान मुलांच्या खेळण्यांसाठी स्वतंत्र जागा, पेव्हर वाहनतळ व्यवस्था, बसण्यासाठी स्वतंत्र लॉन व्यवस्था, फुलांचे आकर्षक उद्यान व आकर्षक वृक्ष लागवड, अत्याधुनिक पावसाळी गटार, स्वतंत्र भूमिगत पाण्याची टाकी, परिसरात आकर्षक व पुरेशी प्रकाश यंत्रणा, घडाळ्याचा स्वतंत्र मीनार, प्रेक्षक गॅलरीचे नूतणीकरण, मोकळे व आकर्षक प्रवेशद्वार, सेल्फी पॉईंट आदी सुविधा या क्रीडांगणात देण्यात येणार आहे. नाशिककरांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी केले आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -