गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढण्याचा निर्णय राजकीय सूडबुद्धी व विद्वेषातून!

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाजपवर सडकून टीका

Mumbai

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढण्याचा निर्णय राजकीय सूडबुद्धी व विद्वेषातून घेण्यात आल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. या निर्णयाचा तीव्र निषेध करून चव्हाण यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली.

ते म्हणाले की, ‘लोकशाहीत राजकीय विरोध असावा; वैयक्तिक शत्रुत्व नसावे. पण विद्यमान पंतप्रधान राजकीय विरोधकांना जणू व्यक्तीगत शत्रू समजूनच वागत आले आहे. मागील पाच वर्षात भाजपच्या राजकीय सूडबुद्धीचा अनेकदा प्रत्यय आला आहे. गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढण्यामागेही राजकीय विद्वेष हेच प्रमुख कारण आहे.’

आजवर गांधी कुटुंबातील दोन सदस्य अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहिद झाले आहेत. सुरक्षा काढताना किमान या बाबीचा तरी विचार करणे आवश्यक होते. पण हे सरकार राजकीय सुडातून आंधळे झाले आहे. या सरकारची सद्सद्विवेक बुद्धी संपुष्टात आली आहे. गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढली गेली असली तरी भारतातील कोट्यवधी जनतेचे आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ त्यांच्यासाठी सुरक्षा कवचासारखे काम करेल, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

कशी असते एसपीजी सुरक्षा

एसपीजी सुरक्षा व्यवस्थेद्वारे अतिशय उच्च दर्जाची सुरक्षा अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला देण्यात येते. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांकडे स्नायपर्स, बॉम्ब डिस्पोज करणारे तज्ज्ञ, असतात. एसपीजी मधील कमांडोना विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले असते. तसेच त्यांच्याकडे आत्याधुनिक शस्त्रे असतात. एसपीजी सुरक्षा असणाऱ्या ताफ्यातील वाहनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असते.


पहिल्यांदाच ठाकरे घराण्यावर खोटारडेपणाचा आरोप – उद्धव ठाकरे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here