घरमुंबईमुंबईत ६,६८५ अक्टिव्ह करोना रूग्ण!

मुंबईत ६,६८५ अक्टिव्ह करोना रूग्ण!

Subscribe

आयसीएमआरच्या मार्गदर्शक सुचनांनुसार करोना रुग्णांची नोंद होत असल्याने ९ मार्चपासून आतापर्यंत जरी मुंबईतील रुग्णांचा आकडा ३५ हजाराच्या वर गेला असला तरी प्रत्यक्षात मुंबईत ६,६८५ रुग्ण रुग्णालयात दाखल असल्याचा दावा मुंबई महापालिका आयुक्त चहल यांनी केला आहे. मुंबईत आतापर्यंत १० हजार रुग्णांना घरी सोडण्यात आले असून ७ हजारांहून अधिक रुग्ण हे घरी बंदिस्त होऊन उपचार घेत आहेत. विलगीकरण केलेले आणि लक्षण नसलेले तसेच उपचार झाले नसलेले रुग्णही आपल्याकडे आहेत. त्यामुळे करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण किती आहेत याची आकडेवारी आयसीएमआरने दाखवावी. याबाबत आपण केंद्रिय गृह सचिवांना आणि आरोग्य सचिवांना कळवल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत ३५ हजार रुग्ण असल्याने देशभरात भितीचे वातावरण आहे; पण प्रत्यक्षात फक्त ६६८५ करोना रुग्ण आहेत. यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये आणि लक्षणे दिसत असल्यास महापालिकेच्या १९१६ या क्रमाकावर संपर्क साधावा. महापालिकेच्या खासगी रुग्णालयात बेड्सचा तुटवडा नसून ज्यांना गरज आहे त्यांनीच रुग्णालयात जावे, असे आवाहन चहल यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -