घरमुंबईइंस्टाग्रामवर मायलेकींचे शारीरिक शोषण करणारा वकील गजाआड

इंस्टाग्रामवर मायलेकींचे शारीरिक शोषण करणारा वकील गजाआड

Subscribe

विनयभंगासह आयटी आणि पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई

इंस्टाग्रामवर मायलेकींचे शारीरिक शोषण केल्याप्रकरणी चैतन्य सोनी नावाच्या एका 25 वर्षांच्या वकिलाला साकीनाका पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह आयटी आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून बुधवारी त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले. 41 वर्षांची तक्रारदार महिला ही तिच्या कुटुंबियासोबत अंधेरी परिसरात राहते. तिला सोळा वर्षांची मुलगी असून ती सध्या कॉलेजमध्ये शिकते. ही मुलगी इंस्टाग्रामवर सक्रिय असून तिचे एक अकाऊंट आहे. गेल्या वर्षी तिला एका अज्ञात तरुणाने रिक्वेस्ट पाठविली होती.

त्यानंतर या तरुणाने तिच्यासह तिच्या कुटुंबियांचे फोटो घेतले होते. तिनेही त्याला ते फोटो पाठवून दिले होते, मात्र फोटो पाठविल्यानंतर त्याने तिला अश्लील फोटो पाठविण्यास सांगितले, तिने नकार देताच तो तिला ब्लॅकमेल करु लागला. तिने तिचे अश्लील फोटो पाठविले नाहीतर तिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल साईटवर अपलोड करु अशी धमकी दिली. या प्रकारानंतर तिने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. मात्र तो तक्रारदारांना त्रास देऊ लागला. त्याच्याकडून सतत होणार्‍या शारीरिक त्रासाला कंटाळून त्यांनी साकीनाका पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती.

- Advertisement -

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरु केला होता. तपासात हा तरुण व्हाईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकोलचा वापर करुन त्यांच्याशी संभाषण करीत होता. त्याचा आयपी अड्रेस हा कराची शहराचा होता. तपासानंतर हा तरुण कराची येथे राहत नसून मध्यप्रदेशच्या जबलपूर शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी त्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली. तपासात त्याचे नाव चैतन्य सोनी असून तो वकिल आहे. अटकेनंतर त्याला ट्रॉन्झिंट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले असून याच गुन्ह्यांत त्याला बुधवारी विशेष सेशन कोर्टात हजर केले. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला आहे. हा मोबाईल तांत्रिक विश्लेषणासाठी न्याय सहाय्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -