स्लोव्हेनिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा

Mumbai
सौरभ वर्माला जेतेपद

भारताचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने स्लोव्हेनिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अव्वल सीडेड सौरभने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत जपानच्या मिनोरु कोगाचा २१-१७, २१-१२ असा सरळ गेममध्ये पराभव केला.

महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात पूजा दांडू आणि संजना संतोष या भारताच्या जोडीला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना इंग्लंडच्या जेनी मूर आणि व्हिक्टोरिया विलियम्स या जोडीने १४-२१, २०-२२ असे पराभूत केले.

मागील वर्षी डच आणि रशियन ओपन जिंकणार्‍या सौरभ वर्माने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला. पहिल्या गेममध्ये ९-१० असा पिछाडीवर असताना त्याने सलग ४ गुण मिळवत १३-१० अशी आघाडी मिळवली.

यानंतर त्याने कोगाला पुनरागमन करू दिले नाही आणि पहिला गेम २१-१७ असा आपल्या खिशात टाकला. दुसर्‍या गेममध्ये ९-९ अशी बरोबरी असताना त्याने आक्रमक खेळ करत २०-११ अशी मोठी आघाडी मिळवल्यावर हा गेम व सामना सहजपणे जिंकला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here