घरक्रीडाWorld Cup 2019 : भारताकडून श्रीलंका पराभूत; सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडशी भिडणार

World Cup 2019 : भारताकडून श्रीलंका पराभूत; सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडशी भिडणार

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेच्या संघाचा सात विकेट्सनी पराभव केले. या विश्वचषक स्पर्धेतील हा भारताचा सातवा विजय होता. या विजयासह भारत गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आला आहे. या सामन्यात भारतीय सलामीवीरांनी जबरदस्त कामगिरी केली. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने भारतीय गोलंदाजांच्या माऱ्याला प्रत्युत्तर देत २६५ धावांचे आश्वासक आव्हान उभे केले. श्रीलंकेच्या या कामगिरीत मॅथ्यूजची कामगिरी महत्त्वाची ठरली. त्याने १२८ चेंडूत ११३ धावा केल्या. यामध्ये १० चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. परंतु, मॅथ्यूजची ही कामगिरी फोल ठरली. कारण भारताने श्रीलंकेवर विजय मिळवला.

श्रीलंकेने दिलेल्या २६५ धावांच्या आव्हान भारताने सहज पूर्ण केले. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १८९ धावांची भागिदारी केली. रोहित शर्माने १०३ तर राहुलने ११४ धावा केल्या. विराट कोहलीने नाबाद ३४ धावांची खेळी केली. तर ऋषभ पंत चार धावांवर बाद झाला.

- Advertisement -

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. दिमुथ करुणरत्ने, कौशल पेरेरा, अविष्का फर्नांडो, कुशल मेंडिस स्वस्तात तंबूत परतले. परंतु, लहिरु थिरीम आणि अॅंजलो मॅथ्यूज यांनी डाव सावरत श्रीलंकेच्या धावा १७९ पर्यंत नेऊन ठेवल्या. लहिरुने अर्धशतक केले. त्यानंतर मॅथ्यूजने शतक साजरी केले. त्यानंतर धनंजय सिल्वाने मॅथ्यूजसोबत डाव सावरला. दोघांनी ७२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर परेरा बाद झाला. ५० षटकांत श्रीलंकेने ७ बाद २६४ धावा केल्या.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -