फडणवीस जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं होतं – थोरात

Mumbai

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधी पक्षनेता देखील नसेल असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकी आधी केले होते. यावर आज महा विकास आघाडीचे मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली. विरोधीपक्ष नेता नसणार म्हणणारे विरोधीपक्ष नेते झाले अशी खोचक प्रतिक्रिया थोरात यांनी दिली. आज मंत्रालयात बाळासाहेब थोरात यांनी आपल्या दालनाचा ताबा घेतला.  देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते होत नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांना आता जास्त पूजा करण्याची गरज असल्याची टीका देखील त्यांनी केली.