घरफोटोगॅलरीPHOTO : तुफानी फटकेबाजी करत ऋषभ पंतने रचले विक्रम

PHOTO : तुफानी फटकेबाजी करत ऋषभ पंतने रचले विक्रम

Subscribe

दिल्ली : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएलच्या 17व्या हंगामातील 40वा सामना बुधवारी रात्री दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सदरम्यान झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत अप्रतिम फॉर्ममध्ये दिसला. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) स्टार फलंदाज विराट कोहलीचा विक्रमही मोडला.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

पंतने गुजरात टायटन्सविरुद्ध मॅच-विनिंग इनिंग खेळताना 43 चेंडूंत 5 चौकार आणि 8 जोरदार षटकारांच्या मदतीने नाबाद 88 धावा केल्या. पंतने गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माच्या गोलंदाजीची अक्षरश: पिसे काढली.

आयपीएलच्या इतिहासात एकाच गोलंदाजाच्या गोलंदाजीवर एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम किंग कोहलीच्या नावावर होता. विराटने आयपीएल 2013मध्ये उमेश यादव गोलंदाजीवर 17 चेंडूत 52 धावा केल्या होत्या.

आता 11 वर्षांनंतर ऋषभ पंतने विराट कोहलीचा हा विक्रम मोडत इतिहास रचला. या सामन्यात ऋषभ पंतने मोहित शर्माच्या 18 चेंडूत 62 धावा केल्या. आतापर्यंत आयपीएलमध्ये एखाद्या खेळाडूच्या गोलंदाजीवर फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

ऋषभ आणि विराटच्या पाठोपाठ हाशिम अमलाचा क्रमांक येतो, त्याने 2017मध्ये लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीवर 51 (16) धावा केल्या आहेत.

याशिवाय, एका सामन्यात एखाद्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही ऋषभ पंतने केला. पंतने मोहित शर्माच्या गोलंदाजीवर एकूण 7 षटकार ठोकले. यापूर्वी रसेल, अय्यर, कोहली, पोलार्ड आणि गेल या खेळाडूंनी एखाद्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर सर्वाधिक 6 षटकार ठोकले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -