भाजप-शिवसेनेमधील नाराज राष्ट्रवादीच्या संपर्कात

Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसला काही नेत्यांनी सोडचिठ्ठी देत भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. मात्र त्यामुळे शिवसेना-भाजपमधील निष्ठावान कार्यकर्ते दुखावले आहेत. मागच्या चार वर्षांपासून निवडणुकीची तयारी करणारे असे कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साम-दाम-दंड-भेद या नीतीप्रमाणे आम्ही आताच त्यांची नावे उघड करणार नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.