अक्षयचा वाढदिवस साजरा करताना व्हिडिओ व्हायरल

Mumbai

अभिनेता अक्षयकुमारने त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई व अंगरक्षक राजकुमार दोरकर यांचा वाढदिवस आपल्या शुटिंग मधून वेळात वेळ काढून साजरा केला. सध्या वाढदिवस साजरा करताना हा व्हिडिओ पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातोय. शिवाय अक्षयकुमारने दाखवलेल्या प्रेमाबद्दल त्याचे कौतुक सुद्धा केले जात आहे.