पंजाबमध्ये स्वच्छतादूताचे नागरिकांनी मानले आभार

MUMBAI

सध्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत. पण बाहेर कोरोनाची भीती असतानाही स्वच्छतादूत आपली कामं नित्यनियमाने करत आहेत. घरातील कचरा घेण्यासाठी प्रत्येकाघरी या लॉकडाऊनच्या काळात सुद्धा घंटागाडी ही येतेच. त्यामुळे आपल्या घरी येणाऱ्या स्वच्छतादूताचे आभार पंजाबमधील नागरिकांनी मानले. या स्वच्छता दूतांवर फुलांचा वर्षाव यावेळी करण्यात आला.