महाजनादेश यात्रेत होर्डिंग्ज लावणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या

Mumbai

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पुणे शहरात आली असताना त्याचे स्वागत करण्यासाठी अनेक आमदार, स्थानिक नेत्यांनी बॅनरबाजी करत पुणे शहराला विद्रुप केले होते. होर्डिंग्ज लावून तिकीट मिळत नाही, अशा कानपिचक्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याच नेत्यांना दिल्या.