स्पिकरची ट्रॉली बनवून निवडणुकीचा प्रचार

Mumbai

निवडणूक म्हटली की प्रचार आलाच. सर्वांपेक्षा हटके प्रचार आणि आपले मुद्दे लोकांपर्यंत नेण्यासाठी कार्यकर्ते शक्कल लढवत असतात. गरज ही शोधाची जननी आहे म्हणतात. या गरजेमधूनच अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी पोर्टेबल स्पिकरला ट्रॉलीवर बसवून मतदारसंघ पिंजून काढलाय.