शिवसेनेतर्फे बार्शीत भूमिपुत्रांसाठी नोकरीची संधी

MUMBAI

शिवसेना सोलापूर जिल्हा बार्शी तालुकातर्फे महाराष्ट्रातील युवक-युवतींच्या हाताला काम देऊन स्वयंपूर्ण बनवण्यासाठी बार्शीमध्ये भूमिपुत्र अभियानाल सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत साडेतीनशे ते चारशे युवक-युवतींनी मोठ्या नामांकित कंपन्यांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले असून ऑनलाईन मुलाखती दिल्या आहेत. परप्रांतीय मजुर कोरोनाच्या काळात महाराष्ट्र सोडून आपापल्या राज्यात निघून गेले. त्यासाठी बार्शी शहर शिवसेनेतर्फे महाराष्ट्रातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी शिवसेनेतर्फे भूमिपुत्र अभियानची सुरुवात केली असल्याची माहिती शिवसेना बार्शी शहर प्रमुख भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली आहे.