अनावश्यक फिरणाऱ्यांना पोलिसांनी बदडले तर काय चुकले?

MUMBAI

जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी लॉकडाऊनमध्ये घरातून बाहेर पडलेल्यांना घरातून बाहेर पडू नका अशी विनंती केली आहे. तुम्ही घरातून बाहेर पडाल पण घरी परत आल्यावर तुमच्या आई, बायको, मुलांना या कोरोनाची लागण कराल. त्यामुळे त्यांच्यासाठी तरी घरातून बाहेर पडू नका असा सल्ला त्यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे अनावश्यक घराबाहेर फिरणऱ्यांना पोलिसांनी बदडले तर काय चुकले? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.