एल्गार परिषदेच्या तपासासाठी SIT स्थापन करणारच

Mumbai

महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम ठरला होता, त्याप्रमाणे काम सुरु आहे की नाही? याची चाचपणी करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. “एनआयएच्या कलम १० नुसार विशेष तपास पथक नेमण्याचा राज्याला अधिकार आहे. त्यामुळे एल्गार परिषदेचा तपास राज्य सरकार करेल. भाजपच्या लोकांना सत्तेत राहण्याचा रोग झालेला आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीच्या विरोधात बातम्या पेरत आहेत.”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.