खासगी लॅबवर कारवाई न केल्यास उग्र आंदोलनाचा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा इशारा

कोरोना काळात नागरिकांना वाजवी दरामध्ये उपचार व चाचणी करण्याचे काम करण्याऐवजी सरकारने खासगी लॅबशी संगनमत करून त्यांची लुट केली. याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी दरेकर यांनी केली. त्याचप्रमाणे याकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.