खासगी लॅबना परवानगी देऊन २७० कोटींचा भ्रष्टाचार

कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने खासगी लॅब मार्फत संगनमत करुन राज्याच्या आरोग्य खात्याने जनतेच्या खिशातून सुमारे २७० कोटी रुपयांची लूट केली असून या गंभीर प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी आज केली.