घरव्हिडिओसंकटग्रस्त व दुर्मिळ समुद्री जीवांबाबत जनजागृती गरजेची

संकटग्रस्त व दुर्मिळ समुद्री जीवांबाबत जनजागृती गरजेची

Related Story

- Advertisement -

मासेमारीचा हंगाम संपत आला आहे. त्यामुळे शेवटच्या हंगामामध्ये मासेमारी करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार केशव ताम्हणकर यांच्या जाळ्यात संकटग्रस्त ‘हिरवे कासव’ (Juvenile green sea turtle) अडकले. यावेळी मच्छीमार बांधवांनी जाळे कापून कासवाची सुटका करून त्याला समुद्रात सोडून दिले. समुद्रातील काही समुद्री जीव हे संकटग्रस्त झाले आहेत. त्यांना वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच मच्छीमारांमध्ये सुद्धा आता संकटग्रस्त आणि दुर्मिळ प्रजातींच्या समुद्री जीवनाबद्दल बऱ्यापैकी जनजागृती निर्माण झाली आहे. त्यामुळे मच्छीमार बांधव आपल्या किंमती जाळ्याचे परवा न करता, जाळे कापून अशा समुद्री जीवांचे प्राण वाचवित आहेत. याशिवाय सागरी जीव संशोधक स्वप्नील तांडेल यांच्या सारखे तरुण मच्छीमारांमध्ये समुद्री जीवांबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे काम करत आहेत.

- Advertisement -