ठाकरेंच्या दौऱ्यावेळी संभाजी भिडेंकडून सागंली बंदचे आवाहन

Mumbai

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्यावर केलेल्या टिकेचे पडसाद आता राज्यभर उमटायला लागले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवार दि. १७ जानेवारी रोजी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एका कार्यक्रमासाठी येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी सांगली बंदचे आवाहन केले आहे. भिडे यांच्या आवाहनानंतर आता शिवसेना – शिव प्रतिष्ठान संघटना आमनेसामने येणार अशी शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here