अभिनेत्री कंगना रनौतचा मुख्यमंत्र्यांना एकेरी उल्लेख

गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळी कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर BMC ने कारवाई केली. ही कारवाई सुरुवात असताना कंगनाने शिवसेना आणि BMC वर चांगलाच निशाणा साधला. मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनाने ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केले होते. त्यानंतर पुन्हा कंगनाने ‘डेथ ऑफ डेमोक्रसी’ असा हॅशटॅग देऊन नवे ट्विट केल्याचे समोर आले आहे. मुंबईत दाखल होताच कंगनाने एक व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्याचे दिसते आहे. तर पुन्हा कंगनाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.