मुंबईत सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामूळे जनजीवन अक्षरश: विस्कळीत झालं. रेल्वेचे तिनही मार्ग ठप्प झाले. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. दरम्यान, धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यामध्ये अभिनेत्री रेणुका शहाणेही अडकली. यावेळी रेणूकाने मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
“मुंबईत गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत जागोजागी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईकरांनो कृपया जिथे आहात तिथेच थांबा. उगाच पाण्यात उतरुन जिवाचे हाल करु नका. एखादे अत्यावश्यक काम असेल तरच पाण्याने तुडूंब भरलेल्या रस्त्यांवर उतरण्याचे धाडस करा” असे आवाहन रेणूका शहाणे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केले आहे. रेणूका शाहणे स्वत:ही या पावसात अडकल्या. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे त्यांची गाडी रस्त्यातच बंद पडली.
#MumbaiSpirit in #MumbaiRains Helping each other in times of distress #Mumbaikars ?? pic.twitter.com/qowHlZzyYo
— Renuka Shahane (@renukash) September 4, 2019
मुंबईकरांचे स्पिरीट
यावेळी देखील पुन्हा मुंबईकरांचे स्पिरीट कामी आले. या साचलेल्या पाण्यात देखीळ मुंबईकर एक मेकांना साथ देत यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. मुंबईतील अनेक ठिकणी बिस्किट आणि पाणी बाटल्यांची सोय नागरिकांनी केली होती.
राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे.