घरमहाराष्ट्रउल्हासनगर मनपा मुख्यालयासमोर उद्यानातील झाडांची कत्तल

उल्हासनगर मनपा मुख्यालयासमोर उद्यानातील झाडांची कत्तल

Subscribe

उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयासमोर असलेल्या महानगर पालिकेच्या ताब्यातील उद्यानावर काही असामाजिक तत्वाच्या लोकांनी बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा प्रयत्न करून त्यातील तीन झाडांची कत्तल केली आहे.

उल्हासनगर मनपा मुख्यालयासमोर असलेल्या उद्यानाच्या जागेवर लडाकू सिरोटा नामक व्यक्तीने प्रशासनाकडून जोखीम आधारित बांधकाम आराखडाची परवानगी मिळवली होती. या गार्डनमध्ये खोदकाम करण्यासाठी तीन झाडांची कत्तल करण्यात आली. या गार्डनच्या सुशोभीकरणासाठी आणि झाडे लावण्यासाठी काही वर्षांपूर्वी महानगर पालिकेने निधी सुद्धा खर्च केला होता. परंतु अचानक त्या उद्यानावर बांधकाम सुरु झाल्यावर भाजपच्या माजी महापौर मिना आयलानी आणि नगरसेविका गीता साधनानी यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना लेखी तक्रार दाखल केली. सदरचे उद्यान महानगरपालिकाचे असून लडाकू सिरोटा यांनी खोटी कागदपत्रे तयार करून महानगरपालिकेची फसवणूक केली. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी पत्रव्यव्हारद्वारे केली होती.


हेही वाचा – केडीएमसीतील कचरा समस्या चव्हाट्यावर

- Advertisement -

बांधकामाचे साहित्य जप्त

महापालिकेचे उपायुक्त मदन सोंडे यांनी याप्रकरणाची माहिती पत्रकारांना दिली.त्यांनी सदरच्या उद्यानाला भेट दिली तसेच उद्यानातील झाडे तोडणा-यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रभाग अधिकारी दत्तात्रय जाधव यांना दिले. प्रभाग अधिकारी दत्तात्रय जाधव यांनी बांधकाम करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करून पुढील कारवाईला सुरवात केली असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -