बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटात पदार्पण केलेली बॉलीवूडची अभिनेत्री किम शर्माने काही दिवसांपूर्वीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला. तिचा हा फोटो व्हायरल झाला आहे. ३९ वर्षीय किम शर्माने तिचा बिकीनीमधील फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी भरपूर कमेंट केल्या आहेत. या फोटोला ‘हॅपी गर्ल’ असे कॅप्शन तिने दिले आहे.
- Advertisement -
किम शर्माच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांप्रमाणेच सेलेब्रिटीसुद्धा खूप कमेंट करत आहेत. एवढेच नाही तर तिची स्तुतीसुद्धा केली जात आहे. या फोटोसोबत आणखी एक फोटो किम शर्माने शेअर केला आहे. यामध्ये ती महाराष्ट्र आणि हरयाणा मधील जनतेला मतदानाचे आवाहन करत आहे.
- Advertisement -
मतदान करण्याचे आवाहन करताना किमने ट्विट केले आहे की, “गोष्ट कितीही अस्पष्ट दिसत असली तरी बदलासाठी आशा सोडू नये.”