मोहाडी येथील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने रुग्णाच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील परिसर कन्टेन्मेंट झोन व 3 किलोमीटर अंतरावरील परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे.
गावातील सर्व रस्ते बंद करून कर्मयोगी एकनाथ जाधव प्रवेशद्वार येथून प्रवेश दिला जात आहे. येथे वाहनांची नोंद ठेवली जाते. सॅनिटायझेशननंतरच प्रवेश दिला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक प्रवेशद्वारावर सेवा बजावत आहेत. मोहाडी सोसायटी माजी चेअरमन विलास पाटील, संचालक मनोज मोगरे आणि माजी उपसरपंच बाकेराव मौले प्रयत्नशील आहेत.